सियेरा काउंटी (कॅलिफोर्निया) ही अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील ५८ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र डाउनीव्हिल येथे आहे.
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३,२३६ इतकी होती. ही काउंटी कॅलिफोर्नियातील दुसऱ्या क्रमांकाची कमीतकमी वस्ती असलेली काउंटी आहे.
सियेरा काउंटीची रचना १८५२मध्ये झाली.
येथे जमिनीवर तसेच लगत मोठ्या प्रमाणात सोने सापडले होते. डाउनीव्हिल जवळ १२ किलो सोन्याचा गट्टू डाउनीव्हिलजवळ सापडला होता. तसेच १८५३मध्ये काही फ्रेंच भटक्यांना २३ किलो वजनाचा सोन्याचा गट्टू सापडला. सप्टेंबर१८६९मध्ये सियेरा सिटीजवळ ४९ किलो वजनाचा सो्याचा गट्टू सापडला होता,
सियेरा काउंटी (कॅलिफोर्निया)
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?