सिडनी पॉटिये (२० फेब्रुवारी १९२७ – ६ जानेवारी २०२२) हा बहामियन-अमेरिकन अभिनेता, चित्रपट दिग्दर्शक, कार्यकर्ता आणि मुत्सद्दी होता. १९६४ मध्ये, सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार जिंकणारा तो पहिला कृष्णवर्णीय आणि पहिला बहामियन होता. त्याला दोन स्पर्धात्मक गोल्डन ग्लोब, बाफ्टा, आणि ग्रॅमी पुरस्कार मिळाले असून दोन एमी आणि टोनी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. १९९९ मध्ये, त्याला " अमेरिकन फिल्म इन्स्टिट्यूटच्या १०० स्टार्स " मध्ये स्थान मिळाले. २०२२ मध्ये मृत्यूच्या वेळी पॉटिये हा हॉलिवूड सिनेमाच्या सुवर्णयुगातील शेवटच्या जिवंत तारेपैकी एक होता.
द डिफिएंट वन्स (१९५८) चित्रपटातील प्रमुख भूमिकेसाठी पॉइटियेने खाती मिळवली ज्यासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी ऑस्कर पुरस्काराचे नामांकन मिळाले. याव्यतिरिक्त पॉइटियेला त्या कामगिरीसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा सिल्व्हर बेअर व गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला. १९६४ मध्ये त्यांनी लिलीज ऑफ द फील्ड याचित्रपटासाठी ऑस्कर पुरस्कार जिंकला.
सिडनी प्वॉटिये
यामागील विज्ञान आणि इतिहास.