सिक्कीम विधानसभा निवडणूक, २०१९ ही भारत देशामधील सिक्कीम राज्याची विधानसभा निवडणूक होती. ११ एप्रिल २०१९ रोजी विधानसभेच्या ३२ जागांसाठी सिक्कीम राज्यात मतदान केले गेले. सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंटचे पवनकुमार चामलिंग हे १९९४ ते २०१९ सिक्कीमचे मुख्यमंत्री होते. परंतु २०१९ सालच्या निवडणुकीमध्ये सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा पक्षाने १७ जागांवर विजय मिळवला व पक्षाचे अध्यक्ष प्रेम सिंह तमांग सिक्कीमचे नवे मुख्यमंत्री झाले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सिक्कीम विधानसभा निवडणूक, २०१९
या विषयातील रहस्ये उलगडा.