सिंधू आंबा

थोडक्यात पण महत्त्वाचे.

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, जिल्हा रत्‍नागिरी येथून सन 1992 साली विकसित केलेली ही एक आंब्याची जात आहे. आंब्याच्या रत्ना आणि हापूस या दोन जातीच्या संकरातून निर्माण केलेली सिंधू ही संकरित जात आहे.

या जातीच्या आंब्याची 200 ते 250 फळे प्रति झाड फळे मिळतात.

कोयीचे /सीडचे वजन 6 ते 7 ग्रॅम असते. ती इतर आंब्याच्या तुलनेत लहान व पातळ असते. त्यामुळे या जातीला सीडलेस म्हणतात.

सिंधू जातीच्या आंब्याची गुणवैशिष्ट्ये:

- नियमित फळधारणा

- सका विरहित फळे

- फळातील गराचे प्रमाण अधिक असते

- फळे पिकल्यावर चमकदार पिवळसर आकर्षक लालछटा / लाल लाली दिसतात.

- फळांचा उपयोग प्रक्रियेसाठी तसेच फळे ताजे खाण्यासाठी/टेबलपर्पज

- क्लस्टर बेअरिंग

- रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर व ठाणे इ. भागात प्रामुख्याने लागवड आढळते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →