रत्ना आंबा

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, जिल्हा रत्‍नागिरी येथून सन 1981 साली विकसित केलेली ही एक आंब्याची जात आहे. आंब्याच्या हापूस आणि नीलम या दोन जातीच्या संकरातून निर्माण केलेली रत्ना ही संकरित जात आहे.

या जातीच्या आंब्याची 250 ते 300 फळे प्रति झाड फळे मिळतात.

रत्ना जातीच्या आंब्याची गुणवैशिष्ट्ये:

- नियमित फलधारणा

- सका विरहित फळे

- फळे आकाराने मोठी व अंडाकृती

- फळाचा टी एस एस 19- 21 डिग्री ब्रिक्स

- चोच विरहित फळे

- हिरवट नारंगी रंगाची फळे

- फळांचा उपयोग प्रक्रियेसाठी तसेच फळे ताजे खाण्यासाठी/टेबलपर्पज

- क्लस्टर बेअरिंग

- रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर व ठाणे इ. भागात प्रामुख्याने लागवड आढळते.

- फळे रसाळ व चवदार असतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →