साहिवाल गाय हा एक भारतीय गोवंश असून विशेष करून पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील माउंटगोमेरी येथील उत्पत्ती आहे. ही प्रजाती भारतातील दूध उत्पादनात सर्वोच्च स्थानावर आहे. उष्ण वातावरणात सहज राहणारी आणि शांत स्वभावाची गाय आहे. दूध आणि शेतीकामासाठी बैल यासाठी उपयुक्त आहे.
साहिवाल गायीच्या अनन्य वैशिष्ट्यांमुळे, सहिवाल जातीची विस्तृत प्रमाणात देश व प्रदेशात निर्यात केली जाते. 1950च्या दशकाच्या सुरुवातीला साहिवाल जातीने न्यू गिनीमार्गे ऑस्ट्रेलिया गाठली. ऑस्ट्रेलियामध्ये सुरुवातीच्या काळात दुहेरी हेतूने सहिवाल जातीची निवड केली गेली. ऑस्ट्रेलियन दोन उष्णकटिबंधीय दुग्ध प्रजाती, ऑस्ट्रेलियन मिल्किंग झेबू आणि ऑस्ट्रेलियन फ्रिशियन सहिवाल या दोहोंच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.
साहिवाल बैलांनी लहान, वेगाने वाढणारी वासरे वाढवण्याची क्षमता दर्शविली आहे. ही हवामान प्रतिकूल परिस्थितीत कठोरपणासाठी ओळखली जाते साहिवाल जनावरे युरोपात आणि मुख्यतः ऑस्ट्रेलियात गोमांस उत्पादनासाठी वापरली जातात. पण भारतात मात्र गाईला पवित्र समजल्या कारणाने बऱ्याच राज्यात गाईची कत्तल करणे दंडनीय अपराध आहे, सोबत हिंदू धर्मियांची आस्था गायींशी जुडली असल्या कारणाने गाईला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे.
साहिवाल गाय
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?