"सारे जहाँ से अच्छा" हे एक भारतीय देशभक्तीपर गीत आहे.तराना-ए-हिंदी म्हणजे भारतीयांचे राष्ट्रगीत या नावानेही हे गीत ओळखले जाते. मोहम्मद इकबाल यांनी लहान मुलांसाठी लिहिलेले हे देशभक्तीचे काव्य असून उर्दू भाषेतील गझल या काव्यप्रकारात हे गीत रचण्यात आलेले आहे. १६ ऑगस्ट १९०४ रोजी इत्तेहाद नावाच्या साप्ताहिकात हे गीत प्रथम प्रकाशित झाले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सारे जहाँ से अच्छा
थोडक्यात पण महत्त्वाचे.