१२ सप्टेंबर १८९७ रोजी ब्रिटिश भारतीय लष्कर (शिख सैनिक) आणि पख्तुन ओराकझाई (आदिवासी) यांच्या दरम्यान सारागढीची लढाई लढली गेली. ही लढाई तिराह मोहिमेच्या आधी झाली. ही लढाई उत्तर-पश्चिम फ्रंटियर प्रांतात (आता खैबर पख्तुनखवा, पाकिस्तान) घडली. ब्रिटिश भारतीय सैन्य तुकडीत २१ शिख सैनिक होते. ते ३६ व्या शिखांच्या बटालियनचे (सध्याचे सिख रेजिमेंटचे चौथे बटालियन) सैनिक होते. हे सैन्य तेथे तैनात होते आणि सुमारे १०,००० अफगाणांनी त्यांच्यावर हल्ला केला. हवलदार इशर सिंह यांच्या नेतृत्वाखाली शिखांनी हार पत्करण्या पेक्ष्या लढुन मृत्यूस सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. याच कारणास्तव काही लष्करी इतिहासकारांनी या लढाईला इतिहासातील सर्वात महान लढ्याची उपमा दिली आहे. . दोन दिवसांनी दुसऱ्या ब्रिटिश भारतीय सैन्याच्या तुकडीने हा प्रांत परत काबिज केला होता. १२ सप्टेंबर रोजी "सारागढी दिन" म्हणून दरवर्षी या लढाईचे शिख सैनिक सज्ज होतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सारागढीची लढाई
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.