सारं काही समष्टीसाठी हा एक वार्षिक कला आणि साहित्य महोत्सव आहे. याची सुरुवात मुंबईत १५ जानेवारी इ.स. २०१५ पासून झाली. "नामदेव ढसाळ स्मृती गौरव समिती"द्वारा पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी हा सोहळा दरवर्षी साजरा केला जातो. समष्टीचा उद्देश प्रस्थापित सौंदर्यशास्त्राला मोडून काढणे होय. हा एक प्रकारचा लोकमंच आहे जेथे सर्व कलावंत आणि साहित्यिकांना आपली कला सादर करण्याची मुभा आहे.
आंबेडकरी चळवळीने निर्मिलेल्या साहित्याने भारतीय साहित्यातील रोमँटिसिझमला मोडून काढत नवे सौंदर्यशास्त्र रचले आहे. या नव्या कवितीक सौंदर्यशास्त्राचा नामदेव ढसाळ यांच्या कवितेने यल्गार उभा केला. अशी कविता जी शिकवते 'फुलांच्या सुगंधापेक्षा छान असतो चारित्र्याचा वास'. प्रस्थापितांच्या ब्राह्मणी सौंदर्यशास्त्राला मोडीत काढून लूंपेन सर्वहारा वर्गाचे सौंदर्यशास्त्र प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने दरवर्षी हा सोहळा मुंबई शहरांतील विविध ठिकाणी आयोजित केला जातो.
सारं काही समष्टीसाठी
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.