वैभव छाया

थोडक्यात पण महत्त्वाचे.

वैभव छाया

वैभव छाया ( १७ मे, इ.स. १९८८) हे एक मराठी कवी, मुक्त पत्रकार आणि आंबेडकरवादी लेखक आहेत. त्यांचा जन्म मुंबई येथे झाला.

परितक्त्या मातेसोबत राहणाऱ्या वैभव यांचे बालपण विठ्ठलवाडी येथे गेले. त्यांनी मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेची पदवी संपादन केली. त्यांनंतर काही काळ पत्रकारितेतही काम केले. त्यांच्या आयुष्यातील बराच काळ हा चळवळीत पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणूनच गेला. वैभव छाया यांनी विविध वृत्तपत्रे, मासिके, साप्ताहिकांतून विपूल स्तंभलेखन केले आहे. या लेखनात आंबेडकरी चळवळ, डिजीटल क्षेत्र, सोशल मिडीया हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख विषय होते.

इ.स. २०१४ साली वैभव यांचा पहिला कविता संग्रह ‘डिलीट केलेलं सारं आकाश’ प्रकाशित झाला. या संग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ लेखिका कविता महाजन आणि सामाजिक चळवळीतील ज्येष्ठ नेते ॲड. एकनाथ आव्हाड यांनी केले. हा काव्यसंग्रह लोकप्रसिद्ध झाला आहे. प्रकाशनापूर्वीच अनेकांनी नोंदणी केलेल्या या काव्यसंग्रहाच्या छापलेल्या १००० प्रतींपैकी अर्ध्या प्रती पहिल्या दोन दिवसात संपल्या होत्या.

कवी नामदेव ढसाळ यांच्या स्मृतिप्रित्यर्थ नामदेव ढसाळांच्या निधनानंतर त्यांच्या स्मृती तेवत ठेवण्याच्या इराद्याने वैभव छाया आणि इतर समविचारी मित्रांनी 'नामदेव ढसाळ स्मृती गौरव समिती'ची स्थापना करून नामदेव ढसाळांच्या एकूण आयुष्याला सलाम करणारा सारं काही समष्टीसाठी हा अभिवादनपर कार्यक्रम दरवर्षी १५ जानेवारी रोजी मुंबई येथे साजरा केला जातो. या कार्यक्रमात आंबेडकरी कविता, नामदेव ढसाळ यांच्या कवितांचे वाचन, त्यांच्या कवितांचे नाट्यरूप, त्यांनी लिहिलेल्या गाण्यांचे सादरीकरण तसेच त्यांच्या जीवनावर व कवितांवर आधारित चित्रप्रदर्शन, चित्रकविता प्रदर्शन, शाहिरी, कविता वाचन, चर्चासत्र, चित्रपट लघुपट स्क्रीनिंग अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.

या कार्यक्रमात समितीतर्फे दरवर्षी नामदेव ढसाळ यांच्या नावाने एका कवीला गौरवण्यात येते. इ.स. २०१६ रोजी हा मान ख्यातनाम आंबेडकरी कवी लोकनाथ यशवंत यांना मिळाला होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →