सायली संजीव (जन्म : ३१ जानेवारी १९९३) ही अभिनेत्री असून, अनेक दूरचित्रवाणी मालिका, चित्रपट व नाटके यातून तिने काम केले आहे. झी मराठी वरील काहे दिया परदेस ही तिची मालिका विशेष गाजली. सायली संजीव ही मूळची धुळे येथील असून तिचे शालेय तसेच पदवी शिक्षण नाशिक येथे झाले. काहे दिया परदेस आणि परफेक्ट पती या मालिकांत काम करण्यासोबतच तिने पोलीस लाईन, आटपाडी नाईट्स, एबी आणि सीडी आणि सातारचा सलमान या चित्रपटांत भूमिका केल्या आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सायली संजीव
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.