सान लुइस ओबिस्पो अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील शहर आहे. याच नावाच्या काउंटीचे प्रशासकीय केंद्र असलेल्या या शहराची स्थापना इ.स. १७७२मध्ये हुनिपेरो सेराने केली होती. त्याआधी या भागात चुमाश लोकांची वस्ती होती.
२०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४५,११९ इतकी होती. हे शहर रूट १०१वर सान फ्रांसिस्को आणि लॉस एंजेल्सपासून साधारण समान अंतरावर आहे. कॅलिफोर्निया पॉलिटेक्निक स्टेट युनिव्हर्सिटी येथे स्थित आहे.
सान लुइस ओबिस्पो (कॅलिफोर्निया)
या विषयावर तज्ञ बना.