साउथ डकोटा (इंग्लिश: South Dakota) हे अमेरिकेचे एक राज्य आहे. अमेरिकेच्या उत्तर भागात वसलेल्या ह्या राज्यामध्ये तुरळक लोकवस्ती आहे. साउथ डकोटा हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील १७वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने ४६व्या क्रमांकाचे राज्य आहे.
साउथ डकोटाच्या दक्षिणेला नेब्रास्का, पश्चिमेला वायोमिंग, वायव्येला मोंटाना, पूर्वेला मिनेसोटा, आग्नेयेला आयोवा तर उत्तरेला नॉर्थ डकोटा ही राज्ये आहेत. पियेर ही साउथ डकोटाची राजधानी असून सू फॉल्स हे सर्वात मोठे शहर आहे.
साउथ डकोटा
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.