वायोमिंग

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

वायोमिंग

वायोमिंग (इंग्लिश: Wyoming) हे अमेरिकेमधील सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य आहे. अमेरिकेच्या मध्य-उत्तर भागात वसलेल्या ह्या राज्यामध्ये अत्यंत तुरळक लोकवस्ती आहे. वायोमिंग हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील १०वे राज्य आहे.

वायोमिंगच्या उत्तरेला मोंटाना, पश्चिमेला आयडाहो, पूर्वेला साउथ डकोटा व नेब्रास्का, दक्षिणेला कॉलोराडो तर नैर्‌ऋत्येला युटा ही राज्ये आहेत. शायान ही वायोमिंगची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →