सांता क्लॉज (मराठी नामभेद: सँटा क्लॉज ; इंग्लिश: Santa Claus) हे पाश्चिमात्य ख्रिश्चन धर्मात आणि संस्कृतीत आढळणारे काल्पनिक पात्र आहे. सांता क्लॉजाचे नाताळ सणाशी अतूट नाते आहे. सांता क्लॉज जगभरातील मुला-मुलींना नाताळच्या आदल्या रात्री म्हणजे २४ डिसेंबरला खेळणी व इतर भेटवस्तू वाटतो असा ख्रिश्चन लोकांमधे समज आहे.
जगभरातील लहान मुलांचे सांताक्लॉज हे अनोखे आणि आवडते पात्र आहे. बालमनावर सांता क्लॉजच्या प्रेमळ व्यक्तिमत्त्वाची छाप पडलेली आहे.
पाश्चिमात्य देशात विशेषतः युरोपात आणि भारतातही हा नाताळ हा सण उत्साहाने साजरा केला जातो. सुमारे महिनाभर आधीपासून या सणानिमित्त आयोजन सुरू होते.
सांता क्लॉज
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.