नाताळ शुभेच्छापत्र याद्वारे नाताळ सणाच्या शुभेच्छा एकमेकांना दिल्या जातात. नाताळ या सणाविषयीच्या भावना यामध्ये व्यक्त केलेल्या असतात. नाताळ सणाच्या आधी सुमारे आठवडाभर एकमेकांना अशी शुभेच्छापत्र पाठवायला सुरुवात केली जाते. नाताळ सणाच्या पाठोपाठ येणाऱ्या नवीन ग्रेगोरियन वर्षाच्या शुभेच्छा सुद्धा यामध्ये दिल्या जातात. यामध्ये शुभेच्छा कविता, गीते, बायबल या ग्रंथातील वचने यांनी सजविलेली असतात. सुट्टीच्या आनंद व्यक्त करणाऱ्या शुभेच्छा सुद्धा यात समाविष्ट केलेल्या असतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →नाताळ शुभेच्छापत्र
थोडक्यात पण महत्त्वाचे.