सांगोला महाविद्यालय हे सोलापूर जिल्ह्याच्या सांगोला येथील एक उच्च महाविद्यालय आहे. हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाशी संलग्न आहे. पूर्वी हे महाविद्यालय कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाशी संलग्न होते.
१९७८ साली महाविद्यालयाची स्थापना झाली होती. सुरुवातीला फक्त कला शाखा कार्यरत होती. १९८१ साली वाणिज्य तर १९९१ साली विज्ञान शाखा सुरू करण्यात आली. पुढे बदलत्या तंत्रज्ञानाला अनुसरून बी.सी.एस्. आणि बी.सी.ए. या अभ्यासक्रमांंची सुरुवात अनुक्रमे २००० आणि २००३ साली करण्यात आली. महाविद्यालयाच्या संकेतस्थळानुसार, शिवाजी विद्यापीठात संगणकीय अभ्यासक्रम याच महाविद्यालयामुळे समाविष्ट केले गेले. २००३ साली एम्.एस्सी(संगणक शास्त्र) ह्या पदव्युत्तर पदवीचा अभ्यासक्रम सुरू केला गेला.
२०२० सालापर्यंत महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेनेचे १२ विद्यार्थी नवी दिल्ली येथील प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी निवडले गेले आहेत. तसेच आजवरचे अनेक माजी विद्यार्थी आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये कार्यरत आहेत.
सांगोला महाविद्यालय (सांगोला)
या विषयावर तज्ञ बना.