साँगक्रन

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

साँगक्रन

साँगक्रन (थाई: เทศกาล สงกรานต์; इंग्रजी: Songkran) हा थाई नववर्ष महोत्सव आहे. थाई नववर्षाचा दिवस दरवर्षी १३ एप्रिलला असतो, परंतु सुट्टीचा काळ १४-१५ एप्रिल मध्येही असतो. "साँगक्रन" हा शब्द ‘संक्रांत’ या संस्कृत शब्दापासून आलेला आहे, ज्याचा शब्दशः अर्थ "ज्योतिषीय मार्ग", म्हणजे परिवर्तन किंवा बदल हा शब्द मकर संक्रांत पासून उधार घेतला आहे, जानेवारीमध्ये भारतात वसंत ऋतूच्या आगमनासाठी साजरा केला जाणाऱ्या हिंदू कापणीचे नाव आहे. ह्या ज्योतिषीय तक्त्यावर मेषच्या उदयासोबत आणि बौद्ध / हिंदू सौर कालगणनेसोबत दक्षिण आणि आग्नेय आशियााच्या अनेक कॅलेंडरच्या नव्या वर्षासोबत मेळ खातो. हा बौद्ध सण थायलंड, म्यानमार, लाओस व इतर बौद्ध राष्ट्रांत साजरा केला जातो.

थायलंडमध्ये साँगक्रन सणाच्या अगोदरच्या दिवशी थाई लोक त्यांची घरे, कपडे व गावातील रस्ते स्वच्छ करतात व अन्न तयार करून नंतर त्याचे भिक्खूंना दान करतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →