सवाई (अनेकवचन सवाया) हा एक काव्य प्रकार (छंद) समर्थ रामदास यांनी नव्याने आणला. त्या काळात मुसलमान फकीर वेगवेगळया प्रकारे त्यांच्या धर्माचा प्रसार करत होते. तेव्हा समर्थांनी सवाया म्हणत लोकांना जागृत करत करत आपल्या धर्माची ओळख करून देत. सवाया खूप आवेशाने म्हटल्या जात, त्यामुळे लोकांमध्ये धर्मप्रेम, देशप्रेम निर्माण होत असावे. सवाया म्हणताना पहिली ओळ दोनदा म्हणावी लागते. ओवी म्हणताना सव्वा पटीने म्हटली जाते. समर्थ म्हणतात :
तुझा भाट मी वर्णितो रामराया
सदा सर्वदा गाय ब्रीदे सवाया
महाराज दे अंगीचे वस्त्र आता
बहुजीर्ण झाली देहे बुद्धि कंथा !
यांतील तुझा मधील झा आणि अंत्याक्षर ‘या’ दीर्घ म्हणायचे. तुझा, सदा, ‘महाराज’मधील महा ही अक्षरे ठासून म्हणायची. गुढी पाड्व्यापासून दशमीपर्यंत वरील श्लोकाचे सूर शे-दीडशे वर्षे गांवांगांवांतून याच पद्धतीने म्हणले जातात.
समर्थ म्हणतात, की रामराया मी तुझा भाट आहे. मी तुझे गुण लोकांना सांगतो आहे. नेहमी मी सवाया विशिष्ट कारणानी गाणार आहे. लोकांना धर्माची, देशाची भक्ती करण्यासाठी प्रवृत्त करणार आहे.
सवाई
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.