सर ज.जी. कलामहाविद्यालय तथा सर जमशेटजी जीजीभॉय स्कूल ऑफ आर्ट (लघुरूप: जे.जे. स्कूल ऑफ आर्ट) ही भारतातील एक अग्रगण्य कलाशिक्षणसंस्था आहे. जमशेटजी जीजीभॉय (१७८३ - १८५९) यांच्या एक लाख रुपयांच्या देणगीमधून १८५७च्या मार्च महिन्यात मुंबईत ‘सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट अँड इंडस्ट्री’ ही संस्था नाना शंकरशेट यांनी दिलेल्या जमिनीवर स्थापन झाली. जमशेटजी जीजीभॉय यांच्या देणगीनिधीचा संस्थेच्या स्थापनेमध्ये मोठा वाटा असल्याने त्यांच्या स्मरणार्थ संस्थेचे नाव त्यांच्या नावावरून ठेवण्यात आले. मात्र ब्रिटिशांनी या संस्थेच्या नावातले ‘अँड इंडस्ट्री’ हे शब्द हटवले.
१९८१ सालापासून ही संस्था मुंबई विद्यापीठाशी संलग्न आहे.
सर ज.जी. कलामहाविद्यालय
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.