सय्यद अमीन

थोडक्यात पण महत्त्वाचे.

सय्यद अमीन मराठी लेखक होते. मुस्लिम विषयांवर त्यांनी सातत्याने लेखन केले. त्यांचा जन्म 20 ऑक्टोबर 1915 सांगली येथे झाला. सांगली नगरीला मराठी साहित्याची परंपरा सुरू करण्यात सय्यद अमीन यांचा मोलाचा वाटा लाभला आहे. त्यांनी मराठी साहित्य क्षेत्राला मुस्लिम समाज जीवनाची ओळख करून दिली. भारताच्या संमिश्र म्हणजे गंगा-जमुनी संस्कृतीचे ते वाहक होते. अर्वाचीन काळात मुस्लिम मराठी साहित्याची सुरुवात सय्यद अमीन यांच्या पासूनच होते. 17 डिसेंबर 1973 रोजी त्यांचे सांगली येथे अपघाती निधन झाले.

मुस्लिम मराठी साहित्य ही संज्ञा त्यांनी सर्वप्रथम सन 1936च्या दरम्यान वापरली 1935 ते 1936 मध्ये ‘मुस्लिम मराठी साहित्य पत्रिका’ त्यांनी संपादीत करून चालवली. महाराष्ट्रभर त्याचे वर्गणीदार होते.

स्वातंत्र्य सेनानी सय्यद अमीन, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यकारिणीचे सदस्य होते.त्यांनी 'अबला' या कादंबरी लेखनासह अनेक चरित्र ग्रंथांची निर्मिती केलेली आहे. त्यांनी काही दिवस 'मुस्लिम साहित्य पत्रिका' नावाचे नियतकालिकही चालवले. त्यांनी मुस्लिम साहित्य परिषद स्थापन करण्याचा प्रयत्न केला पण त्यांना यश आले नाही.

हीच सकल्पना राबवून 1990 साली प्रा. फकरुद्दीन बेन्नूर यांनी मुस्लिम मराठी साहित्य परिषदेची स्थापना केली.

सय्यद अमीन एक थोर लेखक व विचारवंत होते. 10 पेक्षा अधिक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. त्यांची पुस्तके शिवाजी विद्यापीठ (कोल्हापूर) येथे अभ्यासक्रमासाठी लागलेली होती. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सेनेट तसेच मराठी साहित्य परिषदेच्या कार्यकरी मंडळाचे सभासद होण्याचा बहुमान त्यांना मिळाला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →