सदाशिवगड

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

दुर्गादेवी मंदिर पाहून आपण मंदिराच्या वरच्या भागात असणारा किल्ला फक्त प्रवेशद्वार आणि थोडीफार तटबंदी एवढाच शिल्लक आहे. गडाच्या आतमध्ये आधुनिक हॉटेलच्या इमारती जुन्या किल्ल्याला वाकुल्या दाखवतात. किल्ल्याच्या वरच्या भागातून आजूबाजूने निसर्गाचे विहंगम दृश्‍य दिसते.

अठराव्या शतकातील गोव्याच्या राजकारणाचा महत्त्वाचा भाग असणारा सदाशिवगड सध्या कर्नाटक राज्याचा एक भाग आहे. राज्याच्या दक्षिणेकडील काणकोण तालुक्‍याच्या पोळे सीमेपासून सात-आठ किलोमीटर अंतरावर काळी नदीच्या अलीकडच्या काठावर उंच टेकडीवर सदाशिवगड वसला आहे. सदाशिवगड पाहायच्या आधी सदाशिवगडविषयी माझ्या कल्पना वेगळ्या होत्या. परंतु सदाशिवगड पाहिल्यावर माझ्या कल्पनांना धक्काच बसला. सदाशिवगड पाहण्यासाठी आम्ही प्रथम माझे परिचित सुरेश काणकोणकर काकांकडे कारवारला गेलो. तिथे मी त्यांना सदाशिवगड पाहायला आल्याचे सांगितले. तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितले की, तुम्ही कारवारला येताना सदाशिवगडातूनच आलात. तेव्हा मी म्हणले आम्हाला वाटेत सदाशिवगड गाव लागले, पण गड काही दिसला नाही. त्यावर काणकोणकर काका म्हणाले काळी नदी तुम्ही पार करून आलात तेव्हा नदीच्या अलीकडे पुलासाठी जो उंच डोंगर कापला आहे तोच सदाशिवगड. काळी नदीवरील पुलासाठी आणि कारवारच्या विकासासाठी सदाशिवगड शहीद झाला आहे. हे सर्व ऐकून मला आश्‍चर्याचा धक्काच बसला.

सदाशिवगडावर जाण्यासाठी काळी नदीच्या पुलाच्या अलीकडे चित्ताकुल नावाचे गाव लागते. या गावातून बेळगावला जाणारा फाटा आहे. या फाट्याला लगेच दोनशे ते तीनशे मीटर अंतरावर उजवीकडे छोटा फाटा सदाशिवगडाकडे जातो. या फाट्यावर सदाशिवगडावर जाणारा रस्ता आहे. वाटेत दुर्गादेवीचे मंदिर आहे. मंदिराच्या बाहेर सात मोठ्या तोफा वाटेवर ठेवल्या आहेत. मंदिराच्या बाहेर ब्रिटिश राजचिन्हाचा तुटलेला दगडी भाग ठेवला आहे. मंदिरात सदाशिवगडाविषयी इतिहास सांगणारा फलक लावलेला आहे. त्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी या मंदिरास दोन वेळा भेट दिल्याची नोंद आहे. सदाशिवगड सन १७१७ साली सौंधेकर राजा बसवलिंग यांनी बांधून आपल्या पराक्रमी पित्याचे नाव सदाशिव या गडास दिल्याची नोंद आहे. १७९९ साली ब्रिटिशांनी हा गड ताब्यात घेतल्यावर ब्रिटिश राजचिन्ह या ठिकाणी लावले. दुर्गादेवी देऊळ गडाच्या मध्यास आहे तर खाली भव्य दर्गा आहे. हा दर्गा मध्ययुगात ऍबिसिनियातून आलेल्या एका अवलियाचा आहे.

दुर्गादेवी मंदिर पाहून आपण मंदिराच्या वरच्या भागात असणारा किल्ला फक्त प्रवेशद्वार आणि थोडीफार तटबंदी एवढाच शिल्लक आहे. गडाच्या आतमध्ये आधुनिक हॉटेलच्या इमारती जुन्या किल्ल्याला वाकुल्या दाखवतात. किल्ल्याच्या वरच्या भागातून आजूबाजूने निसर्गाचे विहंगम दृश्‍य दिसते. समोर काळी नदी आणि समुद्राचा दर्यासंगम, नदीपलीकडे नारळाच्या झाडीत आणि हिरव्यागार डोंगराच्या कुशीत दडलेले कारवार शहर. समुद्रात कूर्मगड. अंजदीव आणि इतर छोटी बेटे दिसतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →