डॉ. सदाशिव सखाराम शिवदे ( जन्म : इ.स. १९३७; - पुणे, ७ एप्रिल २०१८) हे ऐतिहासिक विषयांवर लेखन करणारे मराठी साहित्यिक होते.
डॉ. शिवदे हे व्यवसायाने पशुवैद्यक होते. इतिहासाच्या आवडीमुळे ते या क्षेत्रातील अभ्यासाकडे वळले. पशुवैद्यक सेवा पुरवितानाच त्यांनी मराठी, इतिहास विषयात एम. ए.ची पदवी घेतली. त्यांनी लिहिलेले 'ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजे' हे छत्रपती संभाजी महाराज यांचे चरित्र प्रसिद्ध आहे. 'माझी गुरे, माझी माणसे' या ग्रामीण जीवनावर आधारित पुस्तकासह त्यांची इतिहासविषयक २६ पुस्तके प्रकाशित झाली असून त्यांच्या मृत्युसमयी त्यांची दोन पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर होती. भारत इतिहास संशोधन मंडळाचे ते विश्वस्त होते. तसेच महाराष्ट्र राज्य इतिहास परिषदेचे ते माजी अध्यक्ष होते.
सदाशिव शिवदे
थोडक्यात पण महत्त्वाचे.