डॉ. सत्यनारायण दास (जन्म:९ जून १९५४) हे भारतीय गौडीय वैष्णव विद्वान आणि अभ्यासक आहेत. दासा हे बहुविध व्यासंगी विद्वान योगी आहेत. त्यांनी आग्रा विद्यापीठातून संस्कृतमध्ये पीएच.डी. आणि भारतीय कायद्याची पदवी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगमध्ये मास्टर्स ऑफ टेक्नॉलॉजी इत्यादी पदव्या प्राप्त केल्या आहेत. त्यांनी स्थापन केलेल्या जीवा संस्थेत सध्या, गौडीय वैष्णवांच्या क्षेत्रातील अनेक पुस्तके आणि मूळ कागदपत्रे प्रकाशित केली आहेत ज्यात सत् संदर्भावरील भाषांतरे आणि भाष्ये आहेत. याशिवाय त्यांना २०१२ मध्ये भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते देखील पुरस्कार मिळाले आहेत. . दास यांना जीव गोस्वामीनचे प्रमुख जिवंत अभ्यासक-विद्वान म्हणले जाते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सत्यनारायण दास
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!