भारतीय तंत्रज्ञान संस्था (इंग्रजी indian Institutes of Technology; संक्षेप: आय.आय.टी.) ह्या भारत देशामधील स्वायत्त शिक्षण संस्था आहेत. भारत सरकारच्या अखत्यारीत असलेल्या आय.आय.टी. देशातील सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्था मानल्या जातात. आजच्या घडीला देशात एकूण २३ आय.आय.टी. कार्यरत आहेत.
आय.आय.टी.च्या पदवी अभ्यासक्रमामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी १२वी पास झालेल्या विद्यार्थ्यांना जॉइंट एंट्रन्स एक्झॅमिनेशन ही परीक्षा द्यावी लागते. पदव्युत्तर कार्यक्रमात प्रवेश मिळवण्यासाठी उत्सुक विद्द्यार्थ्यांना ग्रॅज्युएट ॲप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनियरिंग (गेट) ही परीक्षा द्यावी लागते.
भारतात पहिल्यांदा १९५१ साली पश्चिम बंगालमध्ये खडगपूर येथे भारतीय तंत्रज्ञान संस्थेची स्थापना करण्यात आली. त्यानंतर मुंबई (१९५८), चेन्नई, कानपूर (१९५९), दिल्ली (१९६३) येथे आणि १९९४ साली गुवाहाटी येथेही आयआयटी उघडण्यात आली. २००१ मध्ये रूडकी विद्यापीठाला आयआयटीचा दर्जा देण्यात आला. २००८-०९ दरम्यान गांधीनगर, जोधपूर, हैदराबाद, इंदोर, पाटणा, भुवनेश्वर, रोपड आणि मंडी याठिकाणी आठ नवीन आयआयटी उघडण्यात आल्या. तेव्हाच बनारस हिंदू विद्यापीठाच्या तंत्रज्ञान संस्थेला भारतीय तंत्रज्ञान संस्थेचा दर्जा देण्यात आला. २०१५-१६ मध्ये तिरुपती, पालक्काड, भिलाई, गोवा, जम्मू आणि धारवाड येथे सहा नवीन आयआयटींची स्थापना करण्यात आली, तसेच आयएसएम धनबादलाही हा दर्जा देण्यात आला.
भारतीय तंत्रज्ञान संस्था
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.