संस्कृत विकिपीडिया हे विकिपीडियाचे संस्कृत संस्करण असून विकिमीडिया संस्था समर्थित विनाशुल्क, जालाधारित, सहयोगी, बहुभाषी विश्वकोश प्रकल्प आहे. आतापर्यंत ह्या विकिपीडियावर जगभरातील प्रतिनिधींद्वारे आणि विशेषत भारत व नेपाळमधील योगदानकर्त्यांमुळे ५००० लेख लिहिण्यात आले आहेत. ह्या विकिपीडियाची स्थापना डिसेंबर २००३ साली झाली असून ऑगस्ट २०११ पर्यंत ही ५००० लेखसंख्येपर्यंत पोहोचली आहे.
संस्कृत विकिपीडिया समुदायाने सहभाग घेतलेले प्रकल्प पुढीलप्रमाणे
टेल अस अबाउट युवर विकिपीडिया
विकिपत्रिका (विकिपीडियाशी संबंधित समुदायलिखित व संपादित वर्तमानपत्र, कथा, घटना व अहवाल)
भारतातील विकिमीडिया फाऊंडेशन सिस्टर प्रोजेक्ट
ऑगस्ट २०१६ पर्यंत १०,१७७ लेखांसह संस्कृत विकिपीडियेचा १३२वा क्रमांक लागतो. संस्कृत विकिपीडियेविषयी द टाईम्स ऑफ इंडिया म्हणते-"संस्कृतचे पुनरूज्जीवन चालू आहे, धन्यवाद विकिपीडिया समुदाय" आणि मदर इंडियाच्यामते संस्कृत विकिपीडिया हे शिक्षणाचे अद्भुत साधन आहे.
संस्कृत विकिपीडिया
यामागील विज्ञान आणि इतिहास.