संमिश्र संख्या

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

संमिश्र संख्या

जर अ आणि ब या वास्तविक संख्या असून, i२ = −१ असेल तर अ + ब i अशा रूपात दर्शवण्यात येणाऱ्या संख्येला संमिश्र संख्या - इंग्रजीमध्ये Complex number (कॉम्प्लेक्स नंबर) म्हणतात. या पदावलीमध्ये अ या भागाला संमिश्र संख्येचा वास्तविक भाग आणि ब या भागाला काल्पनिक भाग म्हणले जाते.

संमिश्र संख्या आलेखावर दर्शवताना वास्तविक भागासाठी क्ष-अक्ष, तर काल्पनिक भागासाठी य-अक्ष वापरतात. संमिश्र संख्या अ + ब i ही आलेखावर (अ, ब) या बिंदूने दर्शवली जाते. ज्या संमिश्र संख्येचा वास्तविक भाग शून्य आहे अशा संख्येला पूर्णतः काल्पनिक म्हणतात, तर ज्या संमिश्र संख्येचा काल्पनिक भाग शून्य असतो ती वास्तविक संख्या असते. अर्थातच सर्व वास्तविक संख्यांचा समावेश संमिश्र संख्यांमध्ये होतो. जे प्रश्न फक्त वास्तविक संख्यांनी सोडवले जाऊ शकत नाहीत ते अनेकदा संमिश्र संख्यांनी सोडवता येतात..

संमिश्र संख्यांच्या गणितातील वापराबरोबरच त्यांचा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, अर्थशास्त्र, विद्युत अभियांत्रिकी आणि सांख्यिकी यासारख्या अनेक क्षेत्रांमध्ये व्यावहारिक उपयोग होतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →