संभाषणात्मक वापरकर्ता इंटरफेस

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

संभाषण इंटरफेस (सीयूआय) हे संगणकांसाठी एक यूजर इंटरफेस आहे जो खऱ्या मनुष्यासह संभाषणाचे अनुकरण करतो. ऐतिहासिकदृष्ट्या, संगणक वापरकर्त्याच्या क्रिया संगणकाला समजणाऱ्या आज्ञामध्ये भाषांतर करण्यासाठी मजकूर-आधारित वापरकर्ता इंटरफेस आणि ग्राफिकल यूजर इंटरफेस (जीयूआय) (उदा. "बॅक" बटण दाबणे) वर अवलंबून आहे. संगणकीय क्रिया पूर्ण करण्याची प्रभावी यंत्रणा असताना, जीयूआय शी संबंधित वापरकर्त्यासाठी एक शिक्षण गरज आहे. त्याऐवजी, वाक्यरचना आधारित इंटरफेस संगणकीय आदेशांऐवजी वापरकर्त्यास त्यांच्या सहज भाषेत संगणकाशी संवाद साधण्याची संधी "सीयूआय" उपलब्ध करतात.

हे करण्यासाठी, संभाषण इंटरफेस संगणकांना मानवी भाषेतून समजून घेण्यासाठी, त्यांचे विश्लेषण करण्यास आणि अर्थ समजण्यास नैसर्गिक भाषा प्रक्रिया (एनएलपी) वापरतात. वर्ड प्रोसेसर सारखे न करता, NLP मानवी भाषेची रचना ग्राह्य धरते. (म्हणजे, म्हणजे अक्षरांची शब्द , शब्दांचे वाक्य आणि वाक्यामधली कल्पना किंवा हेतू जो वापरकर्ता सांगायचा प्रयत्न करत आहे). मानवी भाषेचे अस्पष्ट स्वरूप पाहता मशीनसाठी वापरकर्त्याच्या विनंत्या योग्यरित्या स्पष्ट करणे कठीण करते, म्हणूनच आपण नैसर्गिक भाषा समजूत (एनएलयू) कडे वळत आहे.

एनएलयु हे भावना विश्लेषण आणि संवादात्मक शोध करून प्रश्न चालू ठेवते आणि ह्या सगळ्यात संदर्भ जतन केला जातो. एनएलयू स्पेलिंग चुकांसारखी अरचनात्मक माहिती जी मानवी मेंदूला समजते ती हाताळण्यास मदत करते . उदाहरणार्थ एनएलयूचा वापर करून वापरकर्ता अमेरिकेची लोकसंख्या माहित करून घेऊ शकतो. त्यानंतर वापरकर्त्याने "अध्यक्ष कोण आहे?" असे विचारले तर ते अमेरिकेच्या संदर्भात पुढचा शोध घेऊन उचित प्रतिसाद देईल.

संभाषणात्मक इंटरफेस हे ग्राहकांना कमी खर्चात प्रभावीपणे संबंधित माहिती पुरविण्यासाठी व्यवसायांसाठी एक उत्तम साधन म्हणून उदयास आले आहेत. सीयूआय तंत्रज्ञाना वापरकर्त्याला तांत्रिक गुंतागुंत वगळुन व नवीन गोष्टी न शिकता वापरकर्त्यास संबंधित माहितीचा वापर करण्यासाठीचा मार्ग खुला करून देते .

सध्या विविध प्रकारचे इंटरफेस ब्रँड आहेत. मुख्यतः संभाषणात्मक इंटरफेसच्या दोन मुख्य श्रेणी आहेत - आवाज सहाय्यक आणि चॅटबॉट्स .

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →