एफएक्यू

या विषयातील रहस्ये उलगडा.

एफएक्यू म्हणजे वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची यादी. यामध्ये एका विशिष्ठ मुद्द्यावरची किंवा एका विशिष्ठ प्रश्नावरची उत्तरे नमूद केलेली असतात. एफएक्यूला प्रशोत्तरे असेही संबोधले जाते. प्रश्नोत्तरांचे हे स्वरूप लेख, संकेतस्थळ, ईमेल यादी, ऑनलाइन मंच/ फोरम यांमध्ये वापरले जाते जिथे काही प्रश्न नवीन वापरकर्त्यांकडून पोस्ट वा शंकांच्या माध्यमाने वारंवार विचारले जातात. एफएक्यूचा हेतू वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचे उत्तर वा माहिती देणे हा असतो. तथापि हे स्वरूप माहितीचे आणि प्रश्नांच्या मजकुराचे आयोजन करण्यासाठी वापरतात. मग ते प्रश्न वारंवार विचारले जाणारे आहेत कि नाही याची पर्वा केली जात नाही.

आरंभवादात (initialism) एफएक्यूचा उच्चार सामान्यतः "एफ-ए-क्यू" असा होतो, पण तो संक्षिप्त (acronym) स्वरूपात "फॅक" असा उच्चारतात. युनायटेड स्टेट्स ट्रेझरी साइट्स सारख्या प्रश्नांच्या एकाधिक सूची दर्शविण्यासाठी "एफएक्यू" वापरताना वेब पृष्ठ डिझाइनर बऱ्याचदा प्रश्नांची एक यादी "एफ-ए-क्यू" म्हणून सूचित करतात, जसे गूगल सर्च वर असते तसे. "एफ-ए-क्यू"चा वापर फक्त आणि एकाच वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाच्या संधर्भात होणे हे खूपच क्वचित होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →