संभाजी साहित्य संमेलन

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व जगद्‌गुरू संत तुकोबाराय साहित्य परिषदेच्या वतीने २००८सालापासून छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलन पुरंदर तालुक्यातील कऱ्हा नदीच्या काठावरील सासवड येथे होते. संमेलनाची संकल्पना पत्रकार व कवी दशरथ यादव यांची असून, मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर हे या संभाजी साहित्य संमेलनासाठीचे मार्गदर्शक आहेत. साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे, राष्ट्रीय उपाध्यक्ष राजकुमार काळभोर आहेत, तर तालुकाध्यक्ष प्रा. केशव काकडे,राजाभाऊ जगताप, सुनीललोणकर हे संयोजक आहेत. संभाजी राजांचा जन्म पुरंदर किल्ल्यावर झाला. त्यांनी नायिकाभेद, नखशिखांत, बुधभूषण, सातशतक हे ग्रंथ लिहिले. त्यांच्या नावाने सुरू झालेले हे महाराष्ट्रातील एकुलते एक संमेलन आहे.

२०१० सालापासून हे संमेलन होते.



१३ मार्च ते १४मार्च २०१० या तारखांना झालेल्या पहिल्या संमेलनाचे अध्यक्ष डॉ. प्रभाकर ताकवले होते. छत्रपती संभाजी राजांच्या बुधभूषण या ग्रंथाचा त्यांनी मराठी अनुवाद केला आहे.

दुसऱ्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. गंगाधर बनबरे हे होते.

तिसऱ्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष इतिहास संशोधक अनंत दारवटकर हे होते.

चौथ्या छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदी रा. आ. कदम यांनी भुषविले होते.

पाचव्या छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलनाच अध्यक्ष बाबासाहेब सौदागर होते.

सहाव्या छ्त्रपती संभाजी महाराज साहि्य संमेलनाचे अध्यक्ष आकाश सोनवणे होते.

७वे राज्यस्तरीय छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलन नारायणपूर (ता. पुरंदर) येथे १२ मार्च २०१६ रोजी झाले. अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार श्रीराम पचिन्द्रे होते.उदघाटक महादेव जानकर होते.

८ वे राज्य स्तरीय छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलनाचे अध्यक्ष इतिहास संशोधक प्रा. नामदेवराव जाधव होते. हे संमेलन पुरंदर किल्ल्यावर झाले.

९वे राज्यस्तरीय छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलन सासवड येथे २६ ऑक्टोबर २०१८ रोजी झाले. संमेलनाध्यक्ष साहित्यिक शरद गोरे होते.

१० वे छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलन १२ मार्च रोजी सासवड येथे झाले, या संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ इतिहास संशोधक भा.ल. ठाणगे होते. संमेलनाच उदघाटक म्हणून व्यंकोजी राजे (तंजावर) तमिळनाडू यांचे तेरावे वंशज युवराज छ्त्रपती संभाजीराजे भोसले होते.

११ वे छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलन २०२० रोजी सासवड येथे संपन्न झाले. संमेलनाध्यक्ष डॉजयप्रकाश घुमटकर होते.

१२ वे छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलन २०२१ रोजी सासवड येथे झाले. संमेलनाध्यक्ष ....होते.

१३ वे छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलन २०२२ रोजी सासवड ला जयदीप कार्यालयात झाले. संमेलनाध्यक्ष गुलाबराव वाघमोडे होते.

१४ वे छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलन २०२३ रोजी सासवड येथे झाले. संमेलनाध्यक्ष डॉबालाजी जाधव होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →