दशरथ यादव

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

दशरथ राजाराम यादव (८ ऑक्टोबर, १९७० - हयात) हे एक मूळचे पत्रकार असलेले मराठी साहित्यिक आहेत. पुरंदर तालुक्यातील माळशिरस (भुलेश्वर) हे त्यांचे मूळ गाव. तेथील कऱ्हा नदीच्या काठावरच त्यांच्या साहित्याचा वटवृक्ष बहरला. पत्रकार, कवी, लेखक, कांदबरीकार, गीतकार, इतिहास संशोधक, नाटककार, वक्ता, दिग्दर्शक असे अष्टपैलू साहित्यिक म्हणून त्यांची ओळख आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बहिःशाल विभागात ते व्याख्याता आहेत. ते सध्या पुणे हडपसर येथे राहत आहेत.

यादव यांनी अनेक व्याख्याने दिली आहेत. मराठी भाषेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य संशोधन परिषदेच्या माध्यमातून राज्याच्या कानाकोपऱ्यांतील लेखक, कवींना साहित्यचळवळींतून त्यांनी प्रोत्साहन दिले आहे. यादव हे गाजलेल्या 'वारीच्या वाटेवर' या महाकांदबरीचे लेखक आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →