संगीता जोशी

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

संगीता जोशी (८ मे, ?? - ) या मराठीतील एक गझलकवी आहेत. बी.एस्‌सी.बी.एड. झालेल्या जोशी एक निवृत्त शिक्षिका आहेत. त्यांनी लिहिलेल्या गझलांची पाचांहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या काव्यसंग्रहांना कुसुमाग्रज, पु.ल.देशपांडे, सुरेश भट, गं.ना.जोगळेकर यांची प्रशंसा लाभली आहे. संगीता जोशी यांनी अमरावती येथे भरलेल्या तिसऱ्या अखिल भारतीय मराठी गजल संमेलनाचें अध्यक्षपद भूषविले होते.

भीमराव पांचाळे, यशवंत देव, गजानन वाटवे, शरद करमरकर, सुरेश देवळे, केदार परांजपे, केदार पंडित, वगैरे संगीतकारांनी संगीता जोशी यांच्या काही गजलांना संगीत दिले आहे. भीमराव पांचाळे, संजीव अभ्यंकर, यशवंत देव आदी गायक संगीता जोशी यांची गजला गातातही.

यशवंत देव यांनीह्यी काही गजलांना चाली दिल्या आहेत. या गजला ते मैफिलीत सादर करत.

संगीता जोशी यांची काही हिंदी गीते गिरीश अत्रे यांनी संगीत देऊन स्वतः गायली आहेत.

व.पु. काळे यांच्या ‘वपुर्झा’ या पुस्तकाचे शीर्षक त्यांना संगीता जोशी यांनी सुचविले होते. या पुस्तकाचे अर्पणपत्र त्यांच्याच नावे आहे..

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →