संगीत शारदा हे नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांनी लिहिलेले आणि दिग्दर्शित केलेले १८९९ मधील मराठी संगीत नाटक आहे. भारतातील नाट्य साहित्य, मुख्यत्वे ऐतिहासिक-पौराणिक कथनांवर केंद्रित असताना, सामाजिक समस्या दाखवणारे आणि बालविवाहाचा विषय हाताळणारे व नेहमिचे नियम मोडणारे हे मराठीतील पहिले नाटक मानले जाते.
कालांतराने, बाल गंधर्व, विष्णुपंत पागनीस, भालचंद्र पेंढारकर यांसारख्या विविध रंगमंचावरील कलाकारांनी शारदाची मुख्य भूमिका साकारली आहे. संगीत नाटकाच्या स्वरूपानुसार, या नाटकात ५० हून अधिक गाणी होती, जी स्वतः देवल यांनी लिहिली आणि संगीतबद्ध केली होती.
हे नाटक "भारतातील सामाजिक नाटकातील अग्रगण्य मानले जाते". ह्या नाटकाने लोकप्रियता अशा प्रकारे मिळवली की जेव्हा हरीबिलास सारडा यांनी प्रस्तावित केलेला बालविवाह प्रतिबंध कायदा, (१९२९ मध्ये कायदा संमत झाला) ज्याला "सारडा कायदा" देखील म्हणत असे, त्याला चूकून अनेक वेळा '‘शारदा कायदा’' असे नाव पडले.
संगीत शारदा
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.