संगीत देवबाभळी हे आधुनिक मराठी रंगभूमीवरील एक विक्रमी संगीत नाटक आहे.
हे नाटक संत तुकाराम यांच्या जीवनातील काही प्रसंगांवर आधारित असून त्यांच्या पत्नी आवली आणि रखुमाई यांच्या कथानकावर केंद्रित आहे. या नाटकाचे ८००पेक्षा अधिक प्रयोग सादर झाले असून त्यापैकी १६० पेक्षा जास्त प्रयोग आगाऊ हाऊसफुल ठरले आहेत. या नाटकाला एकूण ४४ पुरस्कार प्राप्त झाले असून आधुनिक मराठी रंगभूमीवरील सर्वाधिक यशस्वी आणि विक्रमी नाटकांपैकी एक म्हणून याची नोंद केली जाते.
संगीत देवबाभळी
या विषयावर तज्ञ बना.