संकल्प भूमी हे गुजरात राज्यातील वडोदरा (बडोदा) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित असलेले एक स्मारक व ऐतिहासिक स्थळ आहे. या स्थळाला दरवर्षी लक्षावधी लोक भेटी देत असतात. २३ सप्टेंबर १९१७ रोजी आंबेडकरांनी सयाजी बागेमध्ये आपल्या तत्कालीन दबलेल्या-पिचलेल्या अस्पृश्य समाजाला जातीयतेतून बाहेर काढण्यासाठी आपले जीवन समर्पित करण्याचा संकल्प केला होता. आंबेडकरांनी संकल्प केलेल्या सयाजी बागेतील त्या जागेला १४ एप्रिल २००६ रोजी "संकल्प भूमी" असे नाव देण्यात आले. गुजरात सरकारद्वारे तेथे आंबेडकरांचे एक भव्य स्मारक निर्माण करण्यात येणार आहे.
संकल्प भूमी हे गुजरात मधील एक प्रमुख बौद्ध व अनुसूचित जातींचे तीर्थस्थळ म्हणून विकसित झाले असून येथे लोक बौद्ध धम्माची दीक्षा घेण्यासाठी येत असतात.
संकल्प भूमी
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.