मुक्तिभूमी (अधिकृत नाव : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्तिभूमी स्मारक) हे नाशिक जिल्ह्यातील येवला येथील एक स्मारक-संग्रहालय आहे. हे स्मारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित आहे. २ एप्रिल २०१४ रोजी या स्मारकाचे लोकार्पण करण्यात आले. या ठिकाणी १३ ऑक्टोबर १९३५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिल्यांदा धर्मांतराची जाहीर घोषणा केली होती. हे आंबेडकरवादी लोक व पर्यटकांसाठी एक महत्त्वपूर्ण स्थळ म्हणून विकसित झाले असून त्यास अनेक लोक भेटी देत असतात. या ठिकाणी विविध उत्सव तसेच सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रम आयोजित केले जातात.
६ डिसेंबर २०२१ रोजी डॉ. आंबेडकर यांच्या ६५व्या महापरिनिर्वाणदिनी, मुक्तीभूमी या स्थळाला महाराष्ट्र राज्य सरकारने 'ब' वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला आहे.
मुक्तिभूमी
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?