जोड कलन, किंवा संकलन (इंग्लिश: Integral Calculus, इन्टिग्रल कॅल्क्युलस ; अर्थ: कलांच्या समुच्चयाचा अभ्यास करणारे शास्त्र ;) ही गणित राशींमधील सूक्ष्म संबंधांवरून स्थूल संबंध काढणारी व त्याचा अभ्यास करणारी कलनाची उपशाखा आहे. कलनाच्या दोन अभिजात उपशाखांमधील ही एक उपशाखा असून भैदिक कलन ही दुसरी प्रमुख उपशाखा आहे.
समजा, f हे x या वास्तव चलावर अवलंबून असणारे एक फल आहे, तर वास्तव रेषेवरील [a, b] या अंतराळातील या फलाचा निश्चित संकलक खालील सूत्राने मांडला जातो :
∫
a
b
f
(
x
)
d
x
{\displaystyle \int _{a}^{b}\!f(x)\,dx\,}
भौमितिक दृष्ट्या हा निश्चित संकलक xy -प्रतलात f फलाचा आलेख, x -अक्ष आणि x = a व x = b या दोन उभ्या लंबांनी वेढलेल्या क्षेत्राचे निव्वळ सचिन्ह क्षेत्रफळाएवढा असतो.
संकलन
यामागील विज्ञान आणि इतिहास.