श्री.ग. माजगांवकर (१९२९ - १९९७) - श्रीकान्त माजगावकर (शिरुभाऊ वा, श्री-ग-मा वा) हे एक पत्रकार, लेखक, प्रकाशक आणि, 'माणूस' या साप्ताहिकाचे संस्थापक संपादक. ते ’माणूसकार श्रीगमा’ या नावाने प्रसिद्ध होते. राजहंस प्रकाशन ही त्यांची मराठी पुस्तक प्रकाशन संस्था.
जन्म - ०१ ऑगस्ट १९२९ (आषाढ कृष्ण एकादशी, शके १८५१)
मृत्यु - पुणे, २० फेब्रुवारी १९९७ (माघ शुद्ध त्रयोदशी, शालिवाहन शके १९१८)
दिलीप माजगावकर - श्रीगमांचे धाकटे बंधू
अलका गोडे, निर्मलाताई पुरंदरे (आधीच्या कुमुद माजगावकर) - बहिणी. निर्मलाताई पुरंदरे (१९३२/३३ - २०१९) या बाबासाहेब पुरंदऱ्यांच्या पत्नी. या स्वतः मोठ्या समाजसेविका होत्या.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे - मेव्हणे
वासुदेव गोडे - बहिणीचे यजमान
कै बाळासाहेब केतकर - बहिणीचे पति, "फ्रेंडस् म्युझिक सेंटर" या सदाशिवपेठेतील दुकानाचे मालक (जुनी गाणी आणि शास्त्रीय संगीताचा उत्तम संग्रह)
श्री. ग. माजगावकर यांनी आपल्या लेखणीद्वारे भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशावर लादलेल्या आणीबाणीविरुद्ध लढा दिला होता. श्रीगमा यांच्या सामाजिक कार्याची स्मृती म्हणून त्यांच्या नावाचा श्रीगमा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार २०१९ ते २०२९ असा ११ वर्षे दिला जाईल, आणि शिरुभाऊंच्या जन्मशताब्दि वर्षात त्याची सांगता होईल.
अलका गोडे यांनी त्यांच्या ’धाकट्या नजरेतून’ या आत्मकथनात्मक पुस्तकातून श्रीगमांच्या आठवणी सांगितल्या आहेत.
श्री.ग. माजगावकर
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?