श्रीनिवास खळे

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

श्रीनिवास खळे

श्रीनिवास खळे (३० एप्रिल, इ.स. १९२६; बडोदा, गुजरात - २ सप्टेंबर, इ.स. २०११) हे मराठी संगीतकार होते. त्यांनी आपल्या कर्णमधुर आणि भावपूर्ण गीतांनी मराठी रसिकांना सहा दशकांहून अधिक काळ मोहिनी घातली होती. हिंदी, संस्कृत, गुजराती, बंगाली इत्यादी भाषांमधील गीतांना खळेअण्णांनी जरी स्वरबद्ध केले असले तरी त्यांचे खरे योगदान हे मराठी भावगीत ह्या गीतप्रकारामध्ये आहे. भावगीतांव्यतिरिक्त ‘बोलकी बाहुली’, जिव्हाळा’, ‘पोरकी’, ‘पळसाला पाने तीन’ यासारख्या निवडक सहा मराठी चित्रपटांना खळेअण्णांनी संगीत दिले होते. तसेच लता मंगेशकर आणि पं. भीमसेन जोशी ह्या दिग्गजांना घेऊन त्यांनी ‘रामश्याम गुणगान’ हा गीतसमूह संगीतबद्ध केला होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →