श्रीकांत कार्लेकर

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

प्रा. डॉ. श्रीकांत कार्लेकर हे मराठी लेखक आहेत. ते विज्ञान, भूगोल, पर्यावरण आदी विषयांसह ललित लेखनही करतात. विविध नियतकालिकांमध्ये कार्लेकरांचे भौगोलिक विषयांवरचे लेख प्रकाशित झाले आहेत. भारतीय मान्सूनची ओळख करून देणारा ‘अचंबित करणारी सूत्रबद्ध यंत्रणा’ हा लेख, तसेच ११ डिसेंबर या आंतरराष्ट्रीय पर्वतदिनानिमित्त दैनिक सकाळमध्ये आलेला त्यांचा ‘साद देती पर्वतशिखरे’ हे लेख वाचकांना आवडले.

वाळूच्या टेकडीचे “केळशी” गाव कोकणात भारजा नदीच्या दक्षिणेला वसले आहे. नदीच्या मुखाजवळील प्रदेशात आणि किनाऱ्यालगत जुन्या वस्तीचे अवशेष सापडतात. हे अवशेष सुमारे १८ मीटर वाळूच्या थराखाली आढळले आहेत. प्रा. डॉ. श्रीकांत कार्लेकर यांनी इ.स. १९९०मध्ये या टेकडीचा शोध लावला. त्यानंतर डॉ. अशोक मराठे यांनी याबाबतचे सर्व समावेशक संशोधन पुढे आणले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →