शेरशाह हा २०२१मध्ये प्रदर्शित झालेला हिंदी भाषेतील चरित्रात्मक युद्ध चित्रपट आहे. हा चित्रपट विष्णूवर्धन दिग्दर्शित आणि संदीप श्रीवास्तव लिखित आहे. हा चित्रपट परमवीर चक्र पुरस्कारप्राप्त कॅप्टन विक्रम बात्रा यांच्या जीवनावर आधारित आहे. ते सैन्यात पहिल्यांदा तैनात झाल्यापासून ते कारगिल युद्धात त्यांच्या मृत्यूपर्यंतचे कथानक यात आहे. या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा बत्राच्या भूमिकेत आणि कियारा अडवाणी त्याची मैत्रीण डिंपल चीमाच्या भूमिकेत आहेत. धर्मा प्रोडक्शन आणि काश एंटरटेनमेंटने या चित्रपटाची निर्मिती केली होती. १२ ऑगस्ट २०२१ रोजी अमेझॉन प्राइम व्हिडिओवर चित्रपटाचा प्रीमियर झाला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →शेरशाह (चित्रपट)
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!