शेरलॉक ही सर आर्थर कॉनन डॉयल यांच्या शेरलॉक होम्सच्या गुप्तहेर कथांवर आधारित एक ब्रिटिश रहस्यमय गुन्हेगारी नाट्य दूरचित्रवाणी मालिका आहे. स्टीव्हन मोफॅट आणि मार्क गॅटिस यांनी तयार केलेल्या या मालिकेमध्ये होम्सच्या भूमिकेत बेनेडिक्ट कंबरबॅच आणि डॉक्टर जॉन वॉटसनच्या भूमिकेत मार्टिन फ्रीमन आहेत. २०१० ते २०१७ पर्यंत चार सत्रांच्या या मालिकेत तेरा भाग आहेत आणि एक विशेष भाग १ जानेवारी २०१६ रोजी प्रसारित झाला. ह्या मालिकेतील कथा वर्तमान काळात घडतात.
शेरलॉकची निर्मिती ब्रिटिश नेटवर्क बीबीसी द्वारे केली. या मालिकेचे चित्रीकरण प्रामुख्याने कार्डिफ, वेल्स येथे झाले आहे. लंडनमधील नॉर्थ गॉवर स्ट्रीटचा वापर होम्स आणि वॉटसनच्या २२२बी बेकर स्ट्रीट निवासस्थानाच्या बाह्य चित्रीकरणासाठी केला आहे.
६६व्या प्राइमटाइम एमी अवॉर्ड्समध्ये तीन श्रेणींमध्ये पुरस्कार जिंकले: मिनीसिरीजमधील उत्कृष्ट प्रमुख अभिनेता (कंबरबॅच), लघु मालिकेतील उत्कृष्ट सहाय्यक अभिनेता (फ्रीमन) आणि लघु मालिकांसाठी उत्कृष्ट लेखन(मॉफॅट). दोन वर्षांनंतर, त्याने उत्कृष्ट टेलिव्हिजन चित्रपट पुरस्कार जिंकला. याव्यतिरिक्त, ह्या कार्यक्रमाला २०११ मध्ये पीबॉडी पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले.
शेरलॉक (दूरचित्रवाणी मालिका)
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.