शुरी किल्ला (首 里 城 शुरी-ज्यू, ओकिनावन: सुई गुशिकु ) हा जपानमधील ओकीनावा प्रांतातील शुरी येथील रियुकुआन गुसुकू किल्ला आहे. १४२९ ते १८७९ च्या दरम्यान ते रियुक्यु राज्याचा राजवाडा होता. त्यानंतर मात्र हा किल्ला फारच दुर्लक्षित झाला. १९४५ मध्ये, ओकिनावाच्या लढाईत, तो जवळजवळ पूर्णपणे नष्ट झाला होता. युद्धा नंतर, किल्ल्याचा वापर विद्यापीठ परिसर म्हणून उपयोगात आणला गेला. १९९२ पासून, बालेकिल्ला आणि भिंतीं मोठ्या प्रमाणात परत बांधण्यात आल्या. यासाठी ऐतिहासिक दस्तावेज, छायाचित्रे आणि आठवंणीचा आधार घेण्यात आला. ३१ ऑक्टोबर २०१९ रोजी, सकाळी, किल्ल्याच्या मुख्य अंगणातील इमारती पुन्हा एकदा आगीत नष्ट झाल्या.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →शुरी किल्ला
थोडक्यात पण महत्त्वाचे.