शुभम रांजणे

या विषयावर तज्ञ बना.

शुभम रांजणे

शुभम सुभाष रांजणे (जन्म २६ मार्च १९९४) हा एक भारतीय-अमेरिकन क्रिकेट खेळाडू असून तो अमेरिका राष्ट्रीय क्रिकेट संघाकडून अष्टपैलू खेळाडू म्हणून खेळतो. तो उजव्या हाताने मधल्या फळीत फलंदाजी आणि उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करतो. अमेरिकेत जाण्यापूर्वी त्याने भारतात प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले होते.

रांजणेने २१ नोव्हेंबर २०१६ रोजी २०१६-१७ रणजी करंडक स्पर्धेत मुंबईसाठी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

जानेवारी २०२६ मध्ये, २०१६ टी२० विश्वचषक स्पर्धेसाठी अमेरिकेच्या संघात रांजणेची निवड करण्यात आली. विश्वचषकादरम्यान, ७ फेब्रुवारी २०२६ रोजी वानखेडे स्टेडियमवर भारता विरुद्ध त्याने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले. स्पर्धेतील पाकिस्तान विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात, त्याने आंतरराष्ट्रीय टी२० कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले. या सामन्यात त्याने ३० चेंडूंत ५१ धावा केल्या.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →