शुक्र ग्रह

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

शुक्र ग्रह

सूर्यमालेमध्ये शुक्र हा सूर्यापासून बुधानंतर, आणि पृथ्वीअगोदर येणारा क्रमाने दुसरा ग्रह आहे. जरी सर्व ग्रहांच्या भ्रमणकक्षा लंबगोलाकार असल्यातरी शुक्राची भ्रमणकक्षा जवळजवळ वर्तुळाकार आहे. याचा व्यास १२,१०४ कि. मी. एवढा आहे. शुक्र देखील अंतर्वर्ती ग्रह आहे. यामुळेच शुक्रदेखील आपल्याला आकाशात फक्त सकाळी किंवा संध्याकाळीच दिसतो.

या ग्रहावर वातावरण अतिशय दाट असल्यामुळे सूर्याचा शुक्रावर पडलेला प्रकाश मोठ्याप्रमाणात परावर्तित होतो. म्हणून शुक्र आपल्याला इतर ग्रहांपेक्षा अधिक तेजस्वी दिसतो.



शुक्र पृथ्वीहून जास्त सूर्याजवळ असल्यामुळे आकाशात नेहमी सूर्याच्या दिशेकडे दिसतो. त्यामुळेच तो पहाटे किंवा संध्याकाळी क्षितिजावर दिसू शकतो. जर तो जास्त प्रखर बनला तर दिवसाही दिसू शकतो. शुक्र हा सूर्य व चंद्रापाठोपाठ पृथ्वीवरून तेजस्वी दिसणाऱ्या चांदण्यांत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याची तेजस्विता -४,६ आहे. तो अंत्यर्वर्ती ग्रह असल्याने तो सूर्यापासून कधीच दूर दिसत नाही. तो जास्तीत जास्त तो ४७.८ अंशापर्यंत दूर जाऊ शकतो. त्याची तेजस्विता ही सूर्योदयाच्या वेळी किंवा सूर्यास्ताच्या वेळी सर्वांत जास्त असते त्यामुळेच त्याला पहाटेचा तारा किंवा सायंतारा असेही म्हणतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →