शुक्राचे अधिक्रमण

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

शुक्राचे अधिक्रमण

शुक्राचे अधिक्रमणही एक खगोलीय घटना आहे. जेव्हा शुक्र ग्रह सूर्याच्या पृथ्वीसापेक्ष कक्षेत येतो, तेव्हा दिसणाऱ्या स्थितीला शुक्राचे अधिक्रमण असे म्हणतात. आपल्याला (पृथ्वीवरून) फक्त बुध व शुक्र यांचीच अधिक्रमणे दिसतात. अधिक्रमणाच्या काळात शुक्र एका बिंदुरूपात सूर्यबिंबावर दिसतो. शुक्राचे अधिक्रमण हे चंद्रामुळे घडणाऱ्या सूर्यग्रहणासारखेच असते. शुक्राचा व्यास चंद्रापेक्षा तीनपट मोठा असला तरी तो पृथ्वीपासून चंद्रासापेक्ष खूप दूर असल्यामुळे शुक्र सूर्यावर छोट्या टिकलीसारखा दिसतो तसेच हळू हलतो. शुक्राचे अधिक्रमण काही तास चालते. (२०१२ मधील अधिक्रमण ६ तास ४० मिनिटे शुक्राचे अधिक्रमणही एक खगोलीय घटना आहे. जेव्हा शुक्र ग्रह सूर्याच्या पृथ्वीसापेक्ष कक्षेत येतो, तेव्हा दिसणाऱ्या स्थितीला शुक्राचे अधिक्रमण असे म्हणतात. आपल्याला (पृथ्वीवरून) फक्त बुध व शुक्र यांचीच अधिक्रमणे दिसतात. अधिक्रमणाच्या काळात शुक्र एका बिंदुरूपात सूर्यबिंबावर दिसतो. शुक्राचे अधिक्रमण हे चंद्रामुळे घडणाऱ्या सूर्यग्रहणासारखेच असते. शुक्राचा व्यास चंद्रापेक्षा तीनपट मोठा असला तरी तो पृथ्वीपासून चंद्रासापेक्ष खूप दूर असल्यामुळे शुक्र सूर्यावर छोट्या टिकलीसारखा दिसतो तसेच हळू हलतो. शुक्राचे अधिक्रमण काही तास चालते. (२०१२ मधील अधिक्रमण ६ तास ४० मिनिटे चालले.)

शुक्राची अधिक्रमणे खूपच दुर्मिळ असतात. १२१.५ वर्षांनंतर आठ वर्षांच्या अंतराने दोन व परत १०५.५ वर्षांनंतर आठ वर्षांच्या अंतराने दोन अशी चार अधिक्रमणे २४३ वर्षात होतात व नंतर हा क्रम चालत राहतो.

शेवटचे शुक्राचे अधिक्रमण ५ व ६ जून २०१२ रोजी होते व ते २१व्या शतकातील शेवटचे अधिक्रमण होते. याअधीचे अधिक्रमण २००४ मध्ये घडले. याअधीची अधिक्रमणांची जोदी डिसेंबर १८७४ व डिसेंबर १८८२ मध्ये होती तर यानंतरची जोडी डिसेंबर २११७ व डिसेंबर २१२५मध्ये असेल.

शुक्राची अधिक्रमणे खगोलशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहेत. त्यांचा उपयोग करून सूर्यमालेच्या आकारमानाचा अंदाज मांडण्यात आला होता. इ.स. १६३९ मधील अधिक्रमणादरम्यान पॅरालॅक्स सिद्धांत वापरून सूर्य व पृथ्वीमधील अंतर मोजले गेले. हे त्याकाळच्या इतर अंदाजापेक्षा अधिक अचूक होते. तसेच २०१२ मधील अधिक्रमणकाळात दूरवरचे ग्रह शोधून काढण्यात याचा उपयोग केला शुक्राची अधिक्रमणे खगोलशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहेत. त्यांचा उपयोग करून सूर्यमालेच्या आकारमानाचा अंदाज मांडण्यात आला होता. इ.स. १६३९ मधील अधिक्रमणादरम्यान पॅरालॅक्स सिद्धांत वापरून सूर्य व पृथ्वीमधील अंतर मोजले गेले. हे त्याकाळच्या इतर अंदाजापेक्षा अधिक अचूक होते. तसेच २०१२ मधील अधिक्रमणकाळात दूरवरचे ग्रह शोधून काढण्यात याचा उपयोग केला गेला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →