शीतल साठे

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

शीतल साठे (५ मार्च, १९८६:कासेवाडी वस्ती, पुणे जिल्हा, महाराष्ट्र - ) या एक मराठी लोककलाकार, गायिका, शाहीर, कवयित्री आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या आहेत. त्या इ.स. २०००च्या सुमारास महाराष्ट्रातील कबीर कला मंच ह्या कलापथकाच्या त्या एक मुख्य कलाकार होत्या. दलित, वंचित, शोषितांच्या व्यथा, त्यांचे प्रश्न शाहिरीच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून लोकांसमोर मांडत असतात. भांडवलदारांविरोधात त्या आवाज उठवतात.

साठे आणि त्यांचे तरुण साथीदार विद्रोही शाहीर जलसा प्रकारची गीते गातात. त्यात बिहारच्या मजूरांची, पंजाबच्या शेतकऱ्यांची तसेच देशातल्या अनेक वंचित समाजाचे प्रश्न उद्धृत केले जातात. त्यांच्या म्हणण्यानुसार, "देशात व जगात पसरलेली असमानता आणि शोषणाला नष्ट करण्यासाठी जनतेला जागे करण्यासाठी त्या गीत गायन करतात."

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →