तुकाराम भाऊराव साठे (१ ऑगस्ट , १९२०— १८ जुलै , १९६९) हे अण्णा भाऊ साठे म्हणून ओळखले जाणारे एक मराठी समाजसुधारक, लोककवी आणि लेखक होते. साठे हे हिंदू मातंग समाजामध्ये जन्मलेले होते. त्यांचे लेखन सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या कृतिशीलतेवर आधारलेले होते. साठे हे सुरुवातीस मार्क्सवादी प्रवृत्तीचे होते, सुरुवातीला त्यांच्यावर साम्यवादी विचारसरणीचा प्रभाव होता. त्यांनी प्रामाणिक साहित्य लिहिले. दलित म्हटले की, हिंदू मराठा, ब्राह्मण विरोधी असे लेखन असते. देवांना शिव्या देऊन लपून त्यांचीच पूजा करणे असा दुपट्टी पण त्यांच्या कडे नव्हते त्यांचा हिंदू धर्मावर प्रचंड लोभ होता.श्री हरी विठ्ठलाचे ते भक्त होते. त्यांनी देव मानले. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत देखील त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.
अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरले आहे. महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचे योगदान हे महत्त्वपूर्ण मानले जाते. आजही मोठ्या संख्येने विद्यार्थी व अभ्यासक हे त्यांच्या या साहित्याचा संशोधनात्मक अभ्यास करताना दिसतात. संयुक्त महाराष्ट्र चळवळ लोकमानसात रुजविण्याचे काम शाहीर अण्णा भाऊ साठे, शाहीर अमर शेख आणि शाहीर द.न. गव्हाणकर यांनी केले. मुंबई, मराठवाडा, विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्र तसेच सीमाभागातील अनेक ठिकाणी शाहिरांनी आपल्या लालबावटा कलापथकाचे कार्यक्रम सादर केले. फकिरा या कादंबरीत त्यांनी श्री हरी विठ्ठल यांच्या भक्तीचा महिमा मानला आहे.
अण्णा भाऊ साठे
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.