धर्मपाल कांबळे

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

धर्मपाल कांबळे (जन्म : पुणे, २९ जून १९६३; - पुणे, - ९ डिसेंबर, २०१७) हे एक मराठी साहित्यिक आणि संशोधक होते. त्यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या संपूर्ण वाड्मयाचे संपादन करून त्याचे तीन खंड प्रसिद्ध केले होते. पहिला खंड हा पोवाडे, लावण्या आणि गाणी या विषयीचा, दुसरा खंड हा लोकनाट्याविषयीचा तर तिसरा खंड हा अण्णा भाऊ साठेंच्या कथांविषयींचा आहे. हे तिन्ही खंड २०१० साली प्रकाशित झाले आहेत. धर्मपाल कांबळे यांनीच अण्णा भाऊ साठे यांच्या मूळ घराचा शोध लावला.

कांबळे हे पुण्यातील मार्केट यार्ड येथील पोस्ट ऑफिसमध्ये पोस्टमनची नोकरी करीत होते. त्यांनी अण्णा भाऊ साठे यांचे आत्मचरित्र आणि शोध अण्णा भाऊ साठे यांच्या घराचा ही पुस्तके स्वखर्चाने प्रकाशित केली होती..

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →