शिवा का इन्साफ हा १९८५ मध्ये प्रदर्शित झालेला राज एन. सिप्पी दिग्दर्शित भारतीय हिंदी भाषेतील सुपरहिरो चित्रपट आहे. हा चित्रपट ३डी मध्ये चित्रित केलेला पहिला हिंदी चित्रपट म्हणून ओळखला जातो. ह्या चित्रपटात जॅकी श्रॉफ, पूनम ढिल्लन, शक्ती कपूर, गुलशन ग्रोव्हर यांच्या भूमिका आहेत. चित्रपटाला आर.डी. बर्मन यांनी संगीत दिले आहे व गीत गुलशन बावरा यांनी लिहीले आहे. चित्रपटासाठी ए. राधा स्वामी यांना फिल्मफेर सर्वोत्तम ध्वनी रचना पुरस्कार मिळाला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →शिवा का इन्साफ
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.